तीन वर्षांत ४00 रेल्वे स्थानके वाय-फाय

By Admin | Published: January 23, 2016 04:10 AM2016-01-23T04:10:32+5:302016-01-23T04:11:36+5:30

इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.

400-way railway stations in Wi-Fi | तीन वर्षांत ४00 रेल्वे स्थानके वाय-फाय

तीन वर्षांत ४00 रेल्वे स्थानके वाय-फाय

googlenewsNext

मुंबई : जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी रेल्वेमंत्री आणि गुगलतर्फे २0१८पर्यंत ४00 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. भारतातील व्यस्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा गुगलमार्फत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात ही सुविधा सुरू करण्यात आली.
यानंतर वांद्रे टर्मिनस, दादर त्यानंतर अंधेरी, बोरीवली, सुरत, अहमदाबाद, बडोदा स्थानकात वाय-फाय सुविधा दिली जाणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात सुरू करण्यात आलेली वाय-फाय सेवा मोफत आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून पहिल्या एक तासानंतर त्याचा वेग मात्र कमी होईल, अशी माहिती
या वेळी देण्यात आली. एकाच
वेळी ५0 हजार जण वाय-फाय सुविधेचा वापर करू शकतात. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी (पान ९ वर)कसे वापराल वाय-फाय
फोनमधील सेटिंगमधून वाय-फाय निवडा.
त्यानंतर रेलवायर नेटवर्क निवडून रेलवायर डॉट कॉमवर ब्राऊजर सुरू करा.त्यानंतर स्क्रीनवर फोन नंबर टाइप करा आणि रिसिव एसएमएस प्रेस करा.
एसएमएसच्या माध्यमातून चार डजिटचा एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) कोड मिळेल. हा कोड वाय-फाय लॉगिन स्क्रीनवर एंटर करा. त्यानंतर मोफत वाय-फाय सेवा मिळेल.वायफाय सेवा सुरु केली असून प्रवाशांना त्याचा फायदा होईल. वायफाय सेवा देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यातला होता. त्यानंतर ही सेवा प्रथम मुंबई सेन्ट्रल स्थानकात सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला २0१६ पर्यंत १00 स्थानकांवर वायफाय देण्यात येईल आणि त्यानंतर अन्य स्थानकांवर. दक्षिण पूर्व एशिया आणि भारतातील गुगलचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले की,२0१८ पर्यंत एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्थानकात येणाऱ्या १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. कार्यक्रम दोन तास लेट शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई सेन्ट्रल स्थानकात होणारा वायफाय सेवेचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता सुरु झाला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांना ताटकळत राहावे लागले. विमानप्रवासाला वेळ लागल्याचे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितांची माफी मागितली.

Web Title: 400-way railway stations in Wi-Fi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.