४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Published: January 4, 2015 02:51 AM2015-01-04T02:51:18+5:302015-01-04T02:51:18+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल करीत आज ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

41 Chartered Officers Transfer | ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

प्रशासकीय बदल : महावितरणचे अजय मेहता पर्यावरण विभागात, जयस्वाल ठाण्याचे आयुक्त
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल करीत आज ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांची अखेर बदली झाली असून, त्यांना पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठविण्यात आले आहे.
नगरविकास विभागाचे (१) प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची महसूल विभागात त्याच पदावर बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नितीन करीर हे नगरविकास विभागात आले आहेत. ते आतापर्यंत विक्रीकर आयुक्त होते. आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा हे राज्याचे नवे विक्रीकर आयुक्त असतील. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर नगरविकास विभागाच्या (यूडी २) नव्या प्रधान सचिव असतील. याआधी या पदावर असलेले श्रीकांत सिंह यांना नियोजन विभागाचे प्रधान सचिव व विकास आयुक्तपद देण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे मुंबई मेट्रोच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक असतील. भिडे यांच्या जागी देवाशिष चक्रवर्ती हे शालेय शिक्षण विभागात पण प्रधान सचिव असतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जात आहेत. आतापर्यंत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव असलेले मुकेश खुल्लर आता ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असतील. सहकार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा त्याच पदावर आदिवासी विकास विभागात गेले आहेत. पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची त्याच पदावर वैद्यकीय शिक्षण विभागात बदली झाली आहे.

(कंसात आधीचे पद) एस. एस. झेंडे - मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा (हाफकिन), डॉ. एस. के. शर्मा - प्रधान सचिव सहकार, पणन व वस्रोद्योग (परिवहन), गौतम चटर्जी - अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत), सतीश गवई - प्रधान सचिव गृहनिर्माण (मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा), एस. एस. संधू - प्रधान सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (महसूल), राजेशकुमार - प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क (पाणीपुरवठा व स्वच्छता), ओ. पी. गुप्ता - व्यव. संचालक राज्य वीज वितरण कंपनी (महाव्यवस्थापक बेस्ट), जे. डी. पाटील - महाव्यवस्थापक बेस्ट (नियुक्तीच्या प्रतीक्षेत), एन. के. देशमुख - विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प (मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए), डी. टी. वाघमारे -नवी मुंबई पालिका आयुक्त (व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी विकास महामंडळ), पराग जैन - व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ (मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिटाईम बोर्ड), आबासाहेब जऱ्हाड - शिक्षण आयुक्त; पुणे (नवी मुंबई पालिका आयुक्त), एस. चोकलिंगम - विभागीय आयुक्त, पुणे (शिक्षण आयुक्त), व्ही. व्ही. देशमुख - कृषी आयुक्त पुणे (विभागीय आयुक्त पुणे), उमाकांत दांगट - विभागीय आयुक्त औरंगाबाद (आयुक्त कृषी पुणे), संजीव जयस्वाल - ठाणे पालिका आयुक्त (विभागीय आयुक्त औरंगाबाद), असीमकुमार गुप्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए (ठाणे पालिका आयुक्त), बिपीन श्रीमाळी - व्यवस्थापकीय संचालक राज्य विद्युत निर्मिती कंपनी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी), राजीवकुमार मित्तल - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी (सदस्य सचिव प्रदूषण नियंत्रण मंडळ), आशीष शर्मा - जमाबंदी आयुक्त व संचालक; भूमी अभिलेख पुणे (व्यवस्थापकीय संचालक वीज निर्मिती कंपनी), सी.एन.दळवी - आयुक्त सहकार व निबंधक; पुणे (जमाबंदी आयुक्त), हर्षदीप कांबळे - व्यवस्थापकीय संचालक राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर (अध्यक्ष नागपूर सुधार प्रन्यास), श्याम वर्धने - नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष (नागपूर पालिका आयुक्त), श्रावण हर्डीकर - नागपूर आयुक्त (मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन्नोती मिशन), पी. अनबालगन - सदस्य सचिव राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (सह मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी), सुधीर खानापुरे - मुख्याधिकारी म्हाडा (सहविक्रीकर आयुक्त), उदय चौधरी - मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा), व्ही. के. गौतम - प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार), श्यामकुमार शिंदे - आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (आयुक्त पशुसंवर्धन). (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 41 Chartered Officers Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.