महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त

By admin | Published: December 23, 2016 01:41 AM2016-12-23T01:41:21+5:302016-12-23T01:41:21+5:30

गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख

4.15 lakh poor families of Maharashtra are free from Dhol | महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त

महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त

Next

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने मंत्रालयाने धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्र रेषेखाली राहणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक अर्ज पुणे येथून आले, पण कनेक्शन मिळण्यात लातूर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी अर्ज केले. पैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन पोहोचवून देण्यात आले. सर्वाधिक अर्ज पुणे (७८,७५७), सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी केले. अर्जाच्या तुलनेत सर्वाधिक गॅस कनेक्शन लातूर (२९,४४३), सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले. तसेच नागपूर येथे ३१,७२६ लोकांनी अर्ज भरले. पण १२,२१८ कुटुंबाला कनेक्शन देण्यात आले तर औरंगाबाद येथे ३७,१८८ अर्जापैकी ११,८०७ लोकांना कनेक्शन मिळाले. मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात.
६०० जिल्हा नोडल अधिकारी
संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

Web Title: 4.15 lakh poor families of Maharashtra are free from Dhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.