शासन करणार 43 कोटींची प्रसिद्धी
By admin | Published: August 3, 2014 01:45 AM2014-08-03T01:45:07+5:302014-08-03T01:45:07+5:30
मुख्यमंत्र्यांकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग आपल्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल 42 कोटी 99 लाख 34 हजार 766 रुपये खर्च करणार आह़े
Next
नारायण जाधव - ठाणो
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियासह दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रंच्या माध्यमांतून केलेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे पंतप्रधानपदार्पयत पोहोचलेल्या नरेंद्र मोदींच्या धवल यशाचा बोध घेऊन राज्याच्या लोकशाही आघाडी सरकारनेही आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवणुका लक्षात घेत शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आह़े या विशेष मोहिमेवर मुख्यमंत्र्यांकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग आपल्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल 42 कोटी 99 लाख 34 हजार 766 रुपये खर्च करणार आह़े
येत्या काळात वृत्तपत्र व दूरचित्रवाणीच नव्हेतर बेस्ट, एसटी बससह रेल्वेचे डबेही शासकीय जाहिरातींनी रंगलेले दिसणार आहेत़ इतकेच नव्हे, एसटी स्टँड आणि खासगी उद्योजकांची मक्तेदारी असलेल्या शहरातील मुख्य ठिकाणचे होर्डिग्जही शासकीय योजनांच्या जाहिरातींनी झळाळणार आहेत, अशी माहिती खोत यांनी दिली.