राज्यातील ४४ हजार शाळा डिजिटल - मुख्यमंत्री
By admin | Published: May 22, 2017 12:36 AM2017-05-22T00:36:17+5:302017-05-22T00:36:17+5:30
शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशामध्ये १८ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आला असल्याचा दावा करतानाच राज्यातील ४४ हजार शाळा आता पूर्णत:
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशामध्ये १८ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आला असल्याचा दावा करतानाच राज्यातील ४४ हजार शाळा आता पूर्णत: डिजिटल झाल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली. डिसेंबर २०१८ अखेर राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील, असे ते म्हणाले. राज्यातील ५० हजार शिक्षक आज टेकसॅव्ही झाले असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आज डिजिटायझेशन, हायस्पीड टेक्नॉलॉजी याचा शिक्षणात वापर करीत असलो तरी शिक्षणात लेखन-वाचन देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. आज काहीही संशोधन करायचे असले तरी गुगलचा वापर करण्यापेक्षा वाचन वाढवून स्वत:च्या नोटस काढण्याचा सल्ला देतानाच पारंपरिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.