राज्यातील 44 टोल बंद

By admin | Published: June 10, 2014 02:10 AM2014-06-10T02:10:01+5:302014-06-10T02:10:01+5:30

एकूण 44 टोलनाके बंद करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.

44 Toll Offices in the State | राज्यातील 44 टोल बंद

राज्यातील 44 टोल बंद

Next
>अजित पवारांची घोषणा : एसटी बसना अंशत: टोलमुक्तीचा लाभ
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाचे 34, राज्य रस्ते विकास महामंडळाचे 2 आणि नागपूर-घोटी-सिन्नर मार्गावरील महामंडळाचेच 8 असे एकूण 44 टोलनाके बंद करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. एसटी महामंडळाच्या कुठल्याही बसला यापुढे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास विभागाचे टोलनाके याठिकाणी टोल लागणार नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोलनाक्यांवरील टोल केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी आहे. 
अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी सांगितले की, बांधकाम विभागाचे 34 आणि महामंडळाचे दोन नाके बंद करताना 3क्6 कोटी रुपयांचा परतावा कंत्रटदारांना शासनातर्फे दिला जाईल. रस्ते, पुलांची ही कामे खासगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आली होती. त्यावर प्रत्येकी 15 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च आला होता. मोठय़ा टोल नाक्यांवरील वसुली मात्र सुरू राहणार आहे. टोल नाक्यांविरुद्ध मनसेसह विविध पक्ष रस्त्यावर उतरले होते. (विशेष प्रतिनिधी)
 
बंद करण्यात आलेले नाके
च्रायगड - कोंडफाटा, दांडफाटा व आपटाफाटा. सोलापूर - कुर्डुवाडी बाह्यरस्ता, मंगळवेढा, मरवडे चेकनाका, पंढरपूर-मोहोळ रस्ता, बार्शी-सोलापूर रस्त्यावरील कोळेगाव नाका, अक्कलकोट मैदंर्गी रस्त्यावरील दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण रस्ता व टाकळी कासेगाव रस्त्यावरील कासेगाव फाटा टोलनाका.
च्सांगली - शहराबाहेरील शेरीनाला, बाह्यवळण तपासणी नाका व पथकर नाका. मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील रेल्वेपूल तसेच करमाळ्याजवळील मांगी टोलनाका.
च्वाशिम - शिवनी टोलनाका.
च्मराठवाडा -  चुंबळीफाटा-मांजरसुंबा रस्त्यावरील पाटोदा टोलनाका, औंढा-बसमत रस्त्यावरील चौंढी टोलनाका, नगर-जामखेड रस्त्यावरील पांढरी नाका, तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरील देवसिंगा टोलनाका, तुळजापूर-उजनी रस्त्यावरील काकरंबा टोलनाका, हदगाव-नांदेड रस्त्यावरील गोजेगाव टोलनाका.
च्नाशिक - खानापूर, दोंडाईचा, चिखली, होळफाटा, धुळे बायपास, वडगाव पान, रांजणगाव देशमुख, टाकळी काझी, बिलाखेड, खरडा, नेरी, पुर्णाड व अकुलखेडा. 
च्वर्धा - देवळी टोलनाका
च्रस्ते महामंडळाचे टोलनाके -  मिरज-म्हैसाळा रस्त्यावरील उड्डाणपूल आणि करमाळा रस्ता.
 

Web Title: 44 Toll Offices in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.