पश्चिम विदर्भातील ४४२ शाळांना ‘स्व-मुल्यांकना’चे वावडे!
By admin | Published: April 11, 2017 12:14 AM2017-04-11T00:14:56+5:302017-04-11T00:14:56+5:30
शाळा सिद्धी उपक्रम; राज्यातील ५१४२ शाळांची शाळा सिद्धीकडे पाठ.
ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा: शाळांचे स्व-मूल्यांकनाकरिता राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत अमरावती विभागातील ११ हजार ४७ शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, ३६३ शाळा प्रगतीपथावर आहेत. मात्र, अद्यापही पश्चिम विदर्भातील ४४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी उपक्रमाला सुरुवात झाली नसल्याने या शाळांना स्व-मूल्यांकनाचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यातील १00 टक्के शाळा समृद्ध व्हाव्यात व शिक्षण हक्क कायदा २00९ ची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता ह्यशाळा सिद्धीह्ण हा राष्ट्रीय कार्यक्रम ह्यसमृद्ध शाळाह्ण या नावाने राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचे मूल्यमापन ह्यशाळा सिद्धीह्ण या राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्यास मदत होणार आहे. सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा शिक्षण हक्क कायद्याने प्राप्त झालेला आहे.
फेब्रुवारी २0१७ अखेर राज्यातील १00 टक्के शाळांचे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन करावयाचे होते. मात्र, या दरम्यान १00 टक्के शाळांचे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली आहे.
ह्यशाळा सिद्धीह्ण या उपक्रमामध्ये सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात आतापर्यंत अमरावती विभागातील ११ हजार ८५२ शाळांपैकी ११ हजार ४७ शाळांनी सहभाग घेतला आहे, तर ३६३ शाळा ह्या शाळा सिद्धी कार्यक्रमात प्रगतीपथावर आहेत. परंतु अद्यापही अमरावती विभागातील ४४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी कार्यक्रमाची सुरुवातच झाली नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ४४२ शाळांचे स्व-मूल्यांकन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२९ एप्रिलपर्यंत करावे लागणार मूल्यांकन पूर्ण!
शाळांच्या मूल्यांकनासाठी फेब्रुवारी २0१७ ची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील हजारो शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा मार्च २0१७ ची मुदत देण्यात आली. तरीसुद्धा काही शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमाकडे पाठ फिरविल्याने आता २९ एप्रिलपर्यंत बाह्य मूल्यांकन पूर्ण करावे लागणार आहे.
५१४२ शाळांची शाळा सिद्धीकडे पाठ
राज्यातील १ लाख ८ हजार ७0७ शाळांपैकी ९७ हजार ७५१ शाळांनी सहभाग घेतला आहे. तर ५ हजार ८१४ शाळा यातील शाळा सिद्धी कार्यक्रमात प्रगतीपथावर आहेत. परंतु अद्यापही राज्यातील ५ हजार १४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी कार्यक्रमाची सुरुवातच झाली नाही. ५ हजार १४२ शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक शाळेत शाळा सिद्धीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी २९ एप्रिलची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शाळांचे स्व-मूल्यांकन झाले नाही, ते २९ एप्रिलपर्यंत पूर्ण होतील.
- एन. के. देशमुख,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.