नालेसफाईसाठी ४५० कामगार

By admin | Published: May 19, 2016 03:43 AM2016-05-19T03:43:20+5:302016-05-19T03:43:20+5:30

राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शहरातील नालेसफाईला सुरुवात झाली आहे.

450 workers for Nalsafai | नालेसफाईसाठी ४५० कामगार

नालेसफाईसाठी ४५० कामगार

Next


भार्इंदर : राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शहरातील नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नालेसफाई १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी सुमारे ४५० कामगार काम करत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या सुमारे १०० ने जास्त असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील नालेसफाईला पुरेसा निधी उपलब्ध नसतानाच त्याच्या प्रस्तावाची मंजुरी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली. नालेसफाईसाठी स्थायी समितीच्या बैठकीला परवानगी मिळावी, यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आयोगाने परवानगी दिल्यानंतर स्थायी समितीने दीड कोटीऐवजी सुरुवातीला ५० लाखाच्या निधीसह नालेसफाईला मान्यता दिली. एकूण लहान-मोठे १५५ नालेसफाईसाठी प्रशासनाने १५ जूनची डेडलाईन निश्चित केली आहे. त्यासाठी सुमारे ४५० कामगार नेमले आहेत. सहा पोकलेन, दोन बोटींसह पोकलेन, पाच जेसीबी, दोन हायड्रो मशिनद्वारे सफाईचे काम सुरु केले आहे.

Web Title: 450 workers for Nalsafai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.