महावितरणच्या योजनांसाठी ४६ कोटी रूपये मंजूर
By admin | Published: October 6, 2016 06:36 PM2016-10-06T18:36:48+5:302016-10-06T18:36:48+5:30
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणच्या विविध कामांसाठी ४६ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 06 - दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणच्या विविध कामांसाठी ४६ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीचे सर्व कामे पारदर्शक व गतीमान पध्दतीने करण्यात येतील अशी माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली़.
केंद्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली आहे़ तसेच राज्यातील शहरी भागात वीजविषयक सुविधा निर्माण करण्याकरिता एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे़ या दोन्ही योजनेतंर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्हा विद्युत समितीची बैठक झाली़ त्यावेळी खा़ मोहिते-पाटील यांनी माहिती दिली़ या बैठकीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खा़ रविंद्र गायकवाड, जि़प़अध्यक्षा जयमाला गायकवाड, आ़ गणपतराव देशमुख, आ़ भारत भालके, आ़ हनुमंत डोळस यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नव्याने निर्माण झालेल्या माळशिरस, मोहोळ व माढा नगरपंचायतीसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत विद्युत कामांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना समितीचे अध्यक्ष खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महावितणच्या अधिकाºयांना दिल्या़ यावेळी पायाभूत सुविधा आराखडा २ मधील प्रलंबित कामे व शेतीपंप विद्युतीकरणाचा, महावितरण आपल्या दारी योजनेतंर्गत केबलव्दारे देण्यात आलेल्या वीज जोडण्यांना विद्युत पोल व तार ओढून वीज पुरवठा करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला़
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतंर्गत तालुकानिहाय मंजूर निधी
उत्तर सोलापूर (७२ लाख), माढा (१ कोटी ४६ लाख), करमाळा (१ कोटी ६५ लाख), माळशिरस (२ कोटी २१ लाख), पंढरपूर (२ कोटी ९२ लाख), मंगळवेढा (१ कोटी २० लाख), सांगोला (३ कोटी ३६ लाख), उत्तर सोलापूर (६१ लाख), दक्षिण सोलापूर (१ कोटी ९२ लाख), अक्कलकोट (७७ लाख), मोहोळ (२ कोटी १७ लाख) असा एकूण १८ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत मंजूर निधी
सोलापूर शहर (९ कोटी ११ लाख), अक्कलकोट (२ कोटी ३६ लाख), मैंदर्गी (२ कोटी १ लाख), बार्शी (२ कोटी ८४ लाख), करमाळा (१ कोटी ७९ लाख), कुर्डूवाडी (१ कोटी ३७ लाख), पंढरपूर (१ कोटी ८९ लाख), मंगळवेढा (२ कोटी ४५ लाख), सांगोला (२ कोटी ३३ लाख) असा एकूण २७ कोटी १० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे़.
जिल्हा विद्युत समितीची बैठक खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ या बैठकीत दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचा आढावा घेण्यात आला़ या दोन्ही योजनेतील कामे दीड वर्षामध्ये पूर्ण करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत़ या योजनेतील कामे पारदर्शकपणे करण्यात येतील़ ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण सज्ज आहे.
-धनंजय औंढेकर
अधिक्षक अभियंता, सोलापूर मंडल़