अमरावती विभागात ४६ हजार मजूर ‘आधार’विना!
By admin | Published: June 19, 2016 02:17 AM2016-06-19T02:17:40+5:302016-06-19T02:17:40+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील मजुरांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याची मोहीम सरकारतर्फे राबविली जात आहे. अमरावती विभागातील पाचही
- संतोष येलकर, अकोला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील मजुरांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याची मोहीम सरकारतर्फे राबविली जात आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील पाच लाख ८१ हजार मजुरांपैकी तीन लाख ५८ हजार ५४६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न (लिंक) करण्यात आले असून विभागातील ४६ हजार २७२ मजूर अद्याप आधार क्रमांकाविनाच आहेत.
अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत रोहयो अंतर्गत एकूण पाच लाख ८१ हजार १३२ मजूर आहेत.
१७ जूनपर्यंत विभागातील एकूण मजुरांपैकी तीन लाख ५८ हजार ५४६ मजुरांचे आधार क्रमांक संबंधित मजुरांच्या बँक खाते क्रमांकाशी संलग्नकरण्यात आले आहेत. परंतु, विभागातील पाचही जिल्ह्यांत ४६ हजार २७२ मजुरांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याने त्यांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम रखडले आहे.
आधार क्रमांक
नसलेले मजूर!
जिल्हामजूर संख्या
अमरावती१६,२७८
अकोला३,७५०
बुलडाणा१,८९७
वाशिम४,६६४
यवतमाळ १९,६८३