मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सापडली ४,६८६ बालके
By admin | Published: July 2, 2016 02:30 AM2016-07-02T02:30:02+5:302016-07-02T02:30:02+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आणि हद्दीत मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील बालकांचा वावर असतो.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आणि हद्दीत मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील बालकांचा वावर असतो. मुंबईचे आकर्षण, पालकांशी न पटणे, मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा, घरातील बंधने न आवडणे इत्यादी कारणांमुळे लहान मुले घरातून पळून येतात. अशा लहान मुलांचा शोध रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) आॅपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून घेतला जात आहे.
मध्यंतरी आॅपरेशन मुस्कान थांबल्यानंतर पोलीस महांसचालकांच्या आदेशानंतर पुन्हा अशा प्रकारचे आॅॅपरेशन २0१६ च्या काही महिन्यांत घेण्यात आले.
यात जानेवारी, एप्रिल आणि जून महिन्यात रेल्वे पोलिसांनी घेतलेल्या मोहिमेत ४ हजार ६८६ बालके पोलिसांना सापडली आहेत. या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर काही बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर केल्याचे जीआरपीकडून सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात दोन हजारपेक्षा जास्त बालके आढळली आहेत. (प्रतिनिधी)
>जानेवारी महिन्यातील मोहीम
फलांटावर मिळून आलेली बालके : मुले - १,४७३, मुली ६२0
बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ११६, मुली - १८
पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - १,३५७, मुली - ६0२
एप्रिल महिन्यातील मोहीम
फलाटांवर मिळून आलेली बालके : मुले - १,१0६, मुली - ४५३
बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ७३, मुली - १३
पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - १,0३४, मुली - ४३९
जून महिन्यातील मोहीम
फलाटांवर मिळून आलेली बालके : मुले - ७२१, मुली - ३१३
बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ७२, मुली - १६
पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - ६४९, मुली - २९७