कोकण किना-यावर ४७ फूट ब्लू व्हेल माशाला जीवदान

By admin | Published: September 12, 2016 08:15 PM2016-09-12T20:15:47+5:302016-09-12T20:15:47+5:30

राजापूरच्या माडबन समुद्र किना-यावर सापडलेल्या ४७ फूट महाकाय ब्लू व्हेल माशाला वनविभाग आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीमुळे जीवदान मिळाले.

47 feet blue whales on the Konkan coast | कोकण किना-यावर ४७ फूट ब्लू व्हेल माशाला जीवदान

कोकण किना-यावर ४७ फूट ब्लू व्हेल माशाला जीवदान

Next

 ऑनलाइन लोकमत 

रत्नागिरी, दि. १२ -  राजापूरच्या माडबन समुद्र किना-यावर सापडलेल्या ४७ फूट महाकाय ब्लू व्हेल माशाला वनविभाग आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीमुळे जीवदान मिळाले. दोन दिवसांपूर्वी स्थानिक मच्छीमारांना हा महाकाय व्हेल मासा जख्मी अवस्थेत समुद्र किना-यावर आढळून आला होता. 
स्थानिकांनी ही माहिती संबंधित अधिका-यांना कळवल्यानंतर नाटेचे सेना विभागप्रमुख सुनील राणे व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी वन विभागाने विशेष मोहिम राबवून वाळूत रुतलेल्या माशाला खोल पाण्यात सोडले. 

Web Title: 47 feet blue whales on the Konkan coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.