जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:58 AM2022-06-16T05:58:13+5:302022-06-16T05:59:08+5:30

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

4700 special trains for Pandharpur Yatra; ST Corporation ready for Ashadi Ekadashi | जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

googlenewsNext

मुंबई :

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी बुधवारी केली. 

यावेळी परब यांनी सांगितले की, आषाढी एकादशीनिमित्त ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (८ जुलै रोजी) २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा.  लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००, अमरावतीतून ७०० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पुरर्ती बसस्थानके 
प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.
पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बसस्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन आहे.

सोडण्यात येणाऱ्या बसेस
    चंद्रभागा बसस्थानक - मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
    भीमा यात्रा देगाव - औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
    विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
    पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

Web Title: 4700 special trains for Pandharpur Yatra; ST Corporation ready for Ashadi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.