एसआरए योजनेत सदनिका देण्याच्या नावाखाली 48 लाखांची फसवणूक, सूत्रधारास अटक
By admin | Published: June 6, 2017 10:31 PM2017-06-06T22:31:38+5:302017-06-06T22:31:38+5:30
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील 25 ते 30जणांकडून 48 लाखांची रोकड
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील 25 ते 30जणांकडून 48 लाखांची रोकड लुबाडणा-या बळीराम कृष्णाजी भोसले (43) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 1क् जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
आपली एसआरएची योजना राबविणा:या अधिका:यांशी ओळख असून एखाद्या चाळीतील झोपडी किंवा विकत घ्या, त्यानंतर तुम्हाला एसआरएच्या इमारतीमध्ये सदनिका मिळवून देतो, असे भोसले आणि त्याच्या काही साथीदारांनी ठाण्यातील उर्मिला वासकर यांच्यासह अनेकांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश चिकने आणि प्रदीप बांदेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार बळीराम हा खेड (र}गिरी) येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस हवालदार भास्कर गावंड, हेमंत पगारे आणि भूषण गावंड आदींनी सापळा लावून त्याला 5 जून रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी ठाणो न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. झोपडयांची बनावट कागदपत्रे दाखवून त्याठिकाणी एसआरएची योजना होणार असल्याची तो बतावणी करायचा. त्याच नावाखाली या झोपडया विकायचा. त्याबदल्यात तीन ते चार वर्षात 300 चौरस फूटांर्पयत सदनिका देण्याचे तो अमिष दाखवायचा. अशा एका सदनिकासाठी पाच ते सात लाखांर्पयत रकमा त्याने रोख स्वरुपात गोळा केला. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.