कोकणसाठी ४८ विशेष ट्रेन
By admin | Published: October 6, 2016 04:59 AM2016-10-06T04:59:50+5:302016-10-06T04:59:50+5:30
मध्य रेल्वेने नवरात्रौत्सव आणि दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर ४८ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन असतील,अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली
मुंबई : मध्य रेल्वेने नवरात्रौत्सव आणि दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर ४८ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन असतील,अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा गर्दीतला प्रवास सुकर होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
ट्रेन नंबर 0१११३/0१११४ दादर-सावंतवाडी-दादर (दहा फेऱ्या)
0१११३ ट्रेन दादर येथून २१ आॅक्टोबर ते ३0 आॅक्टोबर या काळात प्रत्येक रविवारी, मंगळवारी, शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २0.00 वाजता पोहोचेल. 0१११४ ट्रेन सावंतवाडी रोड येथून २२ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर या काळात प्रत्येक सोमवारी, बुधवारी, शनिवारी सकाळी ६.४0 वाजता सुटून दादर येथे त्याच दिवशी १६.३0 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण,सावंतवाडी रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात येईल.
ट्रेन 0१0९५/0१0९६ दादर-सावंतवाडी रोड-दादर (२६ फेऱ्या)
0१0९५ ट्रेन दादर येथून १ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल व सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २0.00 वाजता पोहोचेल. 0१0९६ ट्रेन सावंतवाडी रोड येथून २ नोव्हेंबर ते ३0 नोव्हेंबरपर्यंंत प्रत्येक सोमवारी, बुधवारी, शनिवारी ५.३0 वाजता सुटेल आणि दादर येथे १५.५0 वाजता पोहोचेल.
ट्रेन नंबर 0१0८९/0१0९0 दादर-रत्नागिरी-दादर (चार फेऱ्या)
0१0८९ ट्रेन दादर येथून २१ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ६.00 वाजता पोहोचेल. 0१0९0 ट्रेन रत्नागिरी येथून २२ आॅक्टोबर ते २९ आॅक्टोबरपर्यंत प्रत्येक शनिवारी ८.४0 वाजता सुटून दादर येथे १५.५0 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात येईल.
ट्रेन नंबर 0१00१/0१00२ दादर-रत्नागिरी-दादर (आठ फेऱ्या)
0१00१ ट्रेन ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत दादर येथून २१.४५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ५.00 वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)