इफेड्रीनप्रकरणी ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल
By Admin | Published: October 6, 2016 05:41 PM2016-10-06T17:41:25+5:302016-10-06T17:41:25+5:30
औषध नियमांचे उल्लंघन करुन देश-परदेशात चर्चेत आलेल्या इफेड्रीन तस्करीच्या प्रकरणात एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार
- अमित सोमवंशी/ ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.06 - औषध नियमांचे उल्लंघन करुन देश-परदेशात चर्चेत आलेल्या इफेड्रीन तस्करीच्या प्रकरणात एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर विशेष सत्र न्यायालयात ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनी कार्यरत असलेल्या या कंपनीतून शेकडो टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर आणि त्याची व्याप्तीचे स्वरुपाने देशभर एकच हलकल्लोळ उडला होता.
न्यायालयात दाखल दोषारोपपत्र दाखल झालेल्या मनोज जैनशिवाय अन्य तीन आरोपींमध्ये एव्हॉन कंपनीचे संचालक अजित कामत, राजेंद्र कैमल आणि वाणिज्य व्यवस्थापक प्रभाकर हजारे यांचा समावेश आहे. (पान ४ वर) एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीने उत्पादनविषयक इ व फ मध्ये क्षेत्रीय संचालक, गुंगीकारक औषधीद्रव्ये नियंत्रण केंद्र, मुंबई यांना गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम आदेश सन २0१३, चे नियम ४(६) अन्वये तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तरीही कंपनीने जुलै ते सप्टेंबर २0१३, ऑक्टोबर ते डिसेंबर २0१३ व जानेवारी ते मार्च २0१४ या तीन महिन्यांच्या कालावधीतही तिमाही अहवाल क्षेत्रीय संचालक गुंगीकारक औषधद्रव्ये मुंबई यांना पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.