महाराष्ट्रातील 49 टक्के महिला म्हणतात पतीने मारहाण केल्यास काही गैर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:50 PM2018-01-25T14:50:31+5:302018-01-25T14:50:48+5:30

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 मधून घरगुती हिंसाचारासंबंधी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे ज्यांना पतीने पत्नीला मारहाण करणं चुकीचं वाटत नाही. सर्व्हेक्षणात सहभागी जवळपास 49 टक्के महिलांनी मारहाणीत काहीही गैर नसल्याचं सांगितलं आहे.

49 percent of women in Maharashtra say that if they are beaten by a husband, there is nothing wrong | महाराष्ट्रातील 49 टक्के महिला म्हणतात पतीने मारहाण केल्यास काही गैर नाही

महाराष्ट्रातील 49 टक्के महिला म्हणतात पतीने मारहाण केल्यास काही गैर नाही

Next

ठाणे - राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 मधून घरगुती हिंसाचारासंबंधी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हा आकडा त्या महिलांचा आहे ज्यांना पतीने पत्नीला मारहाण करणं चुकीचं वाटत नाही. सर्व्हेक्षणात सहभागी जवळपास 49 टक्के महिलांनी मारहाणीत काहीही गैर नसल्याचं सांगितलं आहे. या महिलांचं म्हणणं आहे की, जर पत्नीने पतीचं ऐकलं नाही तर मारहाण होणं साहजिक आहे. सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या या महिलांनी सांगितलं आहे की, 'जर पती घरातील कामं न केल्यामुळे, मुलांवर व्यवस्थित लक्ष ने ठेवल्यामुळे किंवा शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करत असेल तर त्यात काही चुकीचं नाही'. 

सर्व्हेक्षणात सहभागी एकूण 3672 महिलांपैकी जवळपास 75 टक्के महिलांनी दारु प्यायल्यानंतर पती रागाच्या भरात हात उचलत असल्याची माहिती दिली आहे. फक्त 16 महिलांनी आपला पती फक्त चहा पित असल्याचं सांगितलं आहे, पण तरीही ते मारहाण करतात. जवळपास 20 टक्के महिलांनी आपला पती कानाखाली मारत असल्याची माहिती दिली आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे पती आणि सासरच्यांकडून मानसिक, भावनिक आणि शारिरीक छळ होत असतानाही फक्त नऊ टक्के महिला मदत मागतात. हा सर्व्हे महाराष्ट्रातील 15 ते 49 वर्ष वयोगटातील एकूण 4658 महिला आणि 4497 पुरुषांसोबत करण्यात आला आहे. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सांगितलं आहे की, 'मला अनेदा घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी मिळतात, पण परंपरा आणि कुटुंबासमोर त्या झुकतात. अनेक महिला आपल्या पतीविरोधात जाण्याची हिंमत दाखवत नाहीत. महिलांनी आपल्या अधिकारासाठी लढलं  पाहिजे. समाजाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्यासाठी काय योग्य आहे याचा विचार केला पाहिजे'.

मानसोपचारतज्ञ डॉ अदिती आचार्य यांनी म्हटलं आहे की, 'अनेक महिला आपल्या पतीवर अवलंबून असल्या कारणाने विरोधात जाण्याचं पाऊल उचलत नाहीत. इतकंच नाही तर सासरच्या बाजूला जाताच महिलांचा दृष्टीकोन बदलतो. स्वत: घरगुती हिंसाचार पीडित असतानाही अनेकदा आपल्या मुलाकडून सुनेला मारहाण होत असताना त्या विरोध करत नाहीत'.

Web Title: 49 percent of women in Maharashtra say that if they are beaten by a husband, there is nothing wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.