कोकणातील ४९० डॉक्टर बेमुदत संपावर
By admin | Published: July 2, 2014 04:28 AM2014-07-02T04:28:21+5:302014-07-02T04:28:21+5:30
डॉक्टरांच्या विविध मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्यामुळे संतापलेल्या एमबीबीएस डॉक्टरांनी राज्य शासनाविरोधात असहकार धोरण जाहीर केले आहे
ठाणे : डॉक्टरांच्या विविध मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्यामुळे संतापलेल्या एमबीबीएस डॉक्टरांनी राज्य शासनाविरोधात असहकार धोरण जाहीर केले आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या मुंबई मंडळातील ठाणे, मुंबई, उल्हासनगर, रायगड, रत्नागिरी आदी ठिकाणच्या जिल्हारूग्णातील सुमारे ४९० डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सर्व रुग्णालयांतील बाह्यरुग्ण तपासणी केंद्र बंद ठेवावी लागल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी लोकमतला सांगितले.
आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ठाणे, उल्हासनगर, रायगड, रत्नागिरी आणि मुंबईतील काही शासकीय रूग्णा झाल्यांमध्ये बाह्यरुग्णांची तपासणी होऊ शकली नाही. मात्र अतिदक्षता विभाग सुरू ठेवून रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्याचा दावाही डॉ. कांबळे यांच्याकडून केला जात आहे. डॉक्टरांच्या या बेमुदत संपात सहभागी न झालेले बीएएमएस डॉक्टर रूग्णांना सेवा देण्यात सतर्क आहे. यामुळे एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांच्या संघटनांमध्ये फूट पडून केवळ एमबीबीएस डॉक्टरांनी हा संप सुरू केला आहे.