डोंबिवलीत ५ दिवसांच्या बालिकेला दुस-या मजल्यावरून फेकले

By Admin | Published: March 12, 2015 01:07 PM2015-03-12T13:07:34+5:302015-03-12T13:07:56+5:30

अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकल्या बालिकेला दुस-या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे

A 5-day girl from Dombivli was thrown out from the second floor | डोंबिवलीत ५ दिवसांच्या बालिकेला दुस-या मजल्यावरून फेकले

डोंबिवलीत ५ दिवसांच्या बालिकेला दुस-या मजल्यावरून फेकले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. १२ - अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकल्या बालिकेला दुस-या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या शेजारी असलेल्या शुभदा नर्सिंग होममध्ये आज सकाळी हा संतापजनक प्रकार घडला असून या घटनेत त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील सुनंदा गायकवाड या महिलेने पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. गुरूवारी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्या चिमुकलीला पाळण्यातून उचलले आणि दुस-या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकून दिले. विशेष म्हणजे यावेळी त्या मुलीची आजी तिच्या पाळण्याजवळ असतानाही ही घटना घडल्याने त्याबाबत संशय व्यक्त होत आहे. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: A 5-day girl from Dombivli was thrown out from the second floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.