नाशिकमधील अपघातात ५ डॉक्टरांचा मृत्यू

By admin | Published: May 18, 2015 09:22 AM2015-05-18T09:22:43+5:302015-05-18T09:24:04+5:30

नाशिकमधील महामार्गांवर अपघातांची मालिका सुरुच असून सोमवारी पहाटे कोकणगाव फाट्याजवळ टेम्पो व कारच्या अपघातात पाच डॉक्टराचां घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

5 doctors die in Nashik accident | नाशिकमधील अपघातात ५ डॉक्टरांचा मृत्यू

नाशिकमधील अपघातात ५ डॉक्टरांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १८ - नाशिकमधील महामार्गांवर अपघातांची मालिका सुरुच असून सोमवारी पहाटे कोकणगाव फाट्याजवळ  टेम्पो व कारच्या अपघातात पाच डॉक्टराचां घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात आणखी एक डॉक्टर जखमी झाले आहेत. 

मुंबई आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणा-या टेम्पोने एसयूव्ही गाडीला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की गाडीतील पाचही डॉक्टरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे, डॉ. कुंदन जाधव व डॉ. शेळके असे या मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर डॉ. उमेश भोसले हे या अपघाातात जखमी झाले आहेत.  पाचही डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे. 

Web Title: 5 doctors die in Nashik accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.