दिग्विजयसिंग यांची ५ तास चौकशी
By admin | Published: October 16, 2015 04:06 AM2015-10-16T04:06:25+5:302015-10-16T04:06:25+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी गुरुवारी येथील विशेष तपास पथकाच्या (एसआयटी)कार्यालयात जाऊन विधानसभेतील बोगस नियुक्तीप्रकरणी
भोपाळ : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी गुरुवारी येथील विशेष तपास पथकाच्या (एसआयटी)कार्यालयात जाऊन विधानसभेतील बोगस नियुक्तीप्रकरणी आपले बयाण नोंदविले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी बंद खोलीत तब्बल ५ तास त्यांचा जाबजबाब घेतला.
सिंग बुधवारीच संपूर्ण तयारीनिशी भोपाळमध्ये डेरेदाखल झाले होते. आज सकाळी ते श्यामला हिल्स निवासस्थानावरून निघाले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्यासोबत होती. सिंग यांनी मनाई केल्यावरही हे कार्यकर्ते त्यांच्यासोबत एसआयटी कार्यालयात पोहोचले. तेथे पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पाच तासांच्या या चौकशीत एसआयटीचे अधिकारी सलीम खान यांनी सिंग यांना जवळपास २५० प्रश्न विचारले. सिंग आणि त्यांच्या वकिलांनी या प्रश्नांची उत्तर दिली.