कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ, इतकं वजन आणि उंची असलेले हे राज्यातील पहिले बाळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:28 AM2017-10-14T04:28:52+5:302017-10-14T04:29:19+5:30

राजारामपुरीतील एका रुग्णालयात ५ किलो वजन आणि ६० सेंटिमीटर उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे, मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.

 The 5 kg baby born in Kolhapur is the first baby in the state with so much weight and height? | कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ, इतकं वजन आणि उंची असलेले हे राज्यातील पहिले बाळ?

कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ, इतकं वजन आणि उंची असलेले हे राज्यातील पहिले बाळ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजारामपुरीतील एका रुग्णालयात ५ किलो वजन आणि ६० सेंटिमीटर उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे, मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.
या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात. माहेर कोल्हापूर आहे. जननी हॉस्पिटलमध्ये डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे त्या उपचार घेत होत्या. वजन आणि उंची जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ असल्याचा दावा डॉ. शिंदे यांनी केला आहे.
यापूर्वी गुजरातमध्ये बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे.

Web Title:  The 5 kg baby born in Kolhapur is the first baby in the state with so much weight and height?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.