बीडमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू, आठ जखमी; दोघांची प्रकृत्ती चिंताजणक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:28 PM2021-03-07T21:28:58+5:302021-03-07T21:29:36+5:30

अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने त्या ठिकाणावरून पळ काढला, नंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी व मालवाहू रिक्षाला धडक दिली.

5 killed 8 injured in Beed truck crash | बीडमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू, आठ जखमी; दोघांची प्रकृत्ती चिंताजणक

बीडमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू, आठ जखमी; दोघांची प्रकृत्ती चिंताजणक

Next

बीड : सरकी वाहून नेणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या तालुक्यातील बीड-परळी रोडवर मोची पिंपळगाव परिसरात घडली. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने त्या ठिकाणावरून पळ काढला, नंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी व मालवाहू रिक्षाला धडक दिली. त्यानंतर ट्रक पलटी झाला मात्र, चालक त्याठिकाणावरून फरार झाल्याची माहिती आहे. यात आठ जखमी झाले असून दोघांची प्रकृत्ती चिंताजणक आहे. 

सरकी वाहून नेणारा भरधाव ट्रक (क्र.एमएच ०९ सीव्ही ९६४४) ने मोची पिंपळगावजवळ एका प्रवासी रिक्षाला (क्र.एमएच २३-५६९४) जोराची धडक दिली. या भिषण अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने त्याठिकाणावरून पळ काढला व तालुक्यातील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी (क्र.एमएच २३ व्ही ३२१६) ला धडक दिली. यात चालक गंभीर जखमी झाला, त्यानंतर पुढे जाऊन लाकडं वाहून नेणाऱ्या एका मालवाहू रिक्षाला (एमएच २० एजी १२६३) जोराची धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पुढे काही अंतरावर जाऊन तर, ट्रक देखील पलटी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र, ट्रकचालकाने त्याठिकाणावरून पळ काढल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनाने त्याठिकाणी धाव घेतली. जखमी व मृतांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. दोघांना औरंगाबादला उपचारासाठी पाठविले आहे.

 

Web Title: 5 killed 8 injured in Beed truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.