नागपंचमीनिमित्त सव्वा लाख भाविकांनी घेतले दर्शन
By admin | Published: August 7, 2016 10:00 PM2016-08-07T22:00:51+5:302016-08-07T22:00:51+5:30
श्री नागेश्वराचे पंचमीच्या पावन पर्वावर दर्शन घेण्यासाठी रविवारी पहाटे २ वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
औंढा नागनाथ : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे पंचमीच्या पावन पर्वावर दर्शन घेण्यासाठी रविवारी पहाटे २ वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सुमारे सव्वालाख भाविकांनी दर्शन घेतले आहे.
नागपंचमी व श्रावण सोमवार सलग लागून आल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे . शनिवारी दुपारपासूनच यासाठी भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. रात्रभर बारी भजन व इतर कार्यक्रम सुरूच होते. मध्यरात्री मुख्य पूजा झाल्यानंतर २ वाजता दरवाजे उघडण्यात आले. दर्शन घेण्यासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. भाविकांचा सुविधेसाठी मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. माहिलांनी प्रतीकात्मक नागाची लाह्या व प्रसाद वाटून पूजा केली . देशाभरातून भाविक दर्शनासाठी आले होते. देणगीच्या माध्यमातून संस्थानला २ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसभर सचिव गजानन वाखरकर, विश्वस्त अॅड पंजाबराव चव्हाण, गणेश देशमुख, विलास खरात, डॉ पुरुषोत्तम देव, पंजाबराव गव्हाणकर, नामदेवराव पवार यांनी परिश्रम घेतले. तसेच सुरक्षेचा आनुषंगाने उपविभागीय आधिकारी प्रसन्नकुमार मोरे, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे एन. एम. कारेगावकर तसेच स्थामिक गुन्हे शाखेचे मारुती थोरात, फुलझळके, गिरधारी कांबळे यांनी पोलिस बंदोबस ठेवला होता (वार्ताहर)