वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:41 AM2023-06-22T05:41:12+5:302023-06-22T05:41:55+5:30

लाखो वारकऱ्यांना यामुळे शासन खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. 

5 lakh insurance cover for workers: Chief Minister Eknath Shinde | वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासन खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. 

या योजनेत वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
 

Web Title: 5 lakh insurance cover for workers: Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.