५ लाख शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

By admin | Published: May 9, 2016 04:08 AM2016-05-09T04:08:55+5:302016-05-09T04:08:55+5:30

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तब्बल ५ लाख ६ हजार २९१ अर्ज महाविद्यालय व जिल्हास्तरावरील समाजकल्याण कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे

5 lakh scholarships are pending | ५ लाख शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

५ लाख शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

Next

दिलीप दहेलकर, गडचिरोली
राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तब्बल ५ लाख ६ हजार २९१ अर्ज महाविद्यालय व जिल्हास्तरावरील समाजकल्याण कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत.
राज्यभरात ३६ जिल्ह्यांतील १६ लाख ७१ हजार ७४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाइन नोंदणी केली. समाजकल्याण विभागाच्या वतीने यापैकी ११ लाख ६५ हजार ४४९ अर्ज मंजूर केले. तर, कागदपत्रांअभावी केवळ ९ हजार ४६८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नाकारले आहेत.
महाविद्यालय स्तरावर ३ लाख ४ हजार ८७९ व जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात १ लाख ९१ हजार ९४४ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.

Web Title: 5 lakh scholarships are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.