‘दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू, तांदूळ’

By Admin | Published: June 4, 2016 03:25 AM2016-06-04T03:25:28+5:302016-06-04T03:25:28+5:30

केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास

5 lakh tons of wheat and rice for drought | ‘दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू, तांदूळ’

‘दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू, तांदूळ’

googlenewsNext

कोल्हापूर : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी येथे दिली.
शासकीय विश्रामधामवर पासवान यांच्या उपस्थितीत अन्न पुरवठा विभागाची आढावा बैठक झाली. त्यास अन्न महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पासवान म्हणाले, की गहू व तांदळाचा साठा येत्या आॅक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने उचलावा. ज्या राज्यात गहू आणि तांदळाचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत आहे, अशा राज्यांतील अतिरिक्त गहू आणि तांदूळ ज्या राज्यांना आवश्यकता आहे, अशा राज्यांमध्ये देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
अन्नसुरक्षा कायदा दोन वर्षांपूर्वी केवळ ११ राज्यांमध्ये लागू होता, तो आता देशभरातील ३३ राज्यांमध्ये लागू झाल्याचे स्पष्ट करून पासवान म्हणाले, की या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशातील एक कोटी ६२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द करण्यात आली. (प्रतिनिधी)
डाळींचे दर १२० रुपयांपर्यंत स्थिर ठेवणार
डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांना शासनाने प्राधान्य दिले आहे. १२० रुपयांपेक्षा डाळींचे दर वाढणार नाहीत, याची दक्षता राज्य सरकारांनी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

Web Title: 5 lakh tons of wheat and rice for drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.