रंगमंचावरच मृत्यू झालेल्या अभिनेत्याच्या मुलीच्या नावे ५ लाखांची ठेव :चंद्रकांतदादा पाटील.
By Admin | Published: March 11, 2017 07:37 PM2017-03-11T19:37:31+5:302017-03-11T19:45:02+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 11 : राजर्षी शाहूंची भूमिका साकारताना रंगमंचावरच एक्झिट घेतलेला अभिनेता सागर चौगुले च्या मुलीच्या नावे ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 : राजर्षी शाहूंची भूमिका साकारताना रंगमंचावरच एक्झिट घेतलेला अभिनेता सागर चौगुले च्या मुलीच्या नावे ५ लाखांची ठेव आणि त्यांच्या पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी जाहीर केले. तसेच जिल्'ातील कलाकारांची यादी तयार करुन त्यांना विविध विमा योजनांतर्गत संरक्षण देण्यात येईल असेही सांगितले.
पुण्यात ३ तारखेला राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अग्निदिव्य नाटक सादर करताना अभिनेता सागर चौगुलेचा ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी महसुल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राजारामपूरी येथील सागरच्या घरी जावून त्याची आई, पत्नीची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना रिक्त पदांची चाचपणी करुन सागरची पत्नी वनिता यांना रुजु करुन घेण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले.