सहायक सरकारी अभियोक्तापदी धुळ्याच्या ५ जणांची निवड
By admin | Published: September 19, 2016 06:59 PM2016-09-19T18:59:54+5:302016-09-19T18:59:54+5:30
मुंबईस्थीत महाराष्ट्र राज्य अभियोग संचलनालयात १७४ सहायक सरकारी अभियोक्ता (गट- अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १९ : मुंबईस्थीत महाराष्ट्र राज्य अभियोग संचलनालयात १७४ सहायक सरकारी अभियोक्ता (गट- अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत धुळ्यातील पाच जणांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांची सहायक सरकारी अभियोक्ता या पदासाठी निवड झाली आहे.
यात अॅड. राकेश प्रभाकर चौधरी (रॅँक २७), अॅड. प्रसाद प्रदीप जोशी (रॅँक ४२), अॅड. ज्योती शशिकांत कढरे (रॅँक ४७), अॅड. सिद्धार्थ मंगा बागले (रॅँक ७०) व अॅड. अमित अनिल साळुंखे (रॅँक १६०) यांचा समावेश आहे.
अॅड. प्रसाद जोशी हे यापूर्वी शिरपूर येथील कर्मवीर व्यंकटराव रंधे विधी महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. तसेच सद्य:स्थितीत अॅड. जोशी व अॅड. सिद्धार्थ बागले हे तासिका तत्त्वावर धुळे येथील सुंदराबाई मगनलाल बियाणी विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संपादीत केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.