राज्यात स्वाइन फ्लूचे ५ बळी
By admin | Published: November 6, 2015 03:09 AM2015-11-06T03:09:09+5:302015-11-06T03:09:09+5:30
बुधवारी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली आहे. त्यातील ४६ जण हे राज्याच्या बाहेरील आहेत.
पुणे : बुधवारी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली आहे. त्यातील ४६ जण हे राज्याच्या बाहेरील आहेत. बुधवारी राज्यात स्वाइन फ्लूमुळे औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सातारा व मध्य प्रदेश येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे आजाराचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक असून, वेळीच डॉक्टरचा योग्य तो सल्ला घेण्याचेही राज्याकडून सांगण्यात येत आहे. बुधवारी स्वाइन फ्लूच्या संशयावरून राज्यातील ६०२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १० जणांना लागण झाल्याचे निदान झाले. अजूनही राज्यातील ११ जण हे व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.