यंदा ५ हजार घरांची लॉटरी!
By admin | Published: December 21, 2015 02:31 AM2015-12-21T02:31:23+5:302015-12-21T02:31:23+5:30
मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आगामी मे महिन्यामध्ये काढण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.
मुंबई : मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आगामी मे महिन्यामध्ये काढण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. या लॉटरीमध्ये मुंबईतील सुमारे १ हजार ८४ घरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पुढील महिन्यात या लॉटरीची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळासह कोकण मंडळाच्या ४ हजार घरांचीही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही लॉटरी एकत्रित काढल्यास या लॉटरीत मुंबईकरांसाठी ५ हजार घरे उपलब्ध होतील.
दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाकडे अधिक घरे नसल्याने मंडळाची लॉटरी मे महिन्यात काढण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये १ हजार ८७ घरांचा समावेश आहे. प्रतीक्षानगर, मालाड आदी ठिकाणच्या घरांचा यामध्ये समावेश असेल. मंडळामार्फत घरांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर पुढील महिन्यात अधिकृतरीत्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार येईल, असे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. जानेवारी महिन्यात कोकण मंडळाची जाहिरात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लॉटरीची तयारी सुरू केली आहे. परंतु अद्याप लॉटरीचे काम पूर्ण झालेले नाही.
विरार बोळींज येथील
सर्वाधिक म्हणजे सुमारे
3500
घरांचा जानेवारीच्या लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे; तर मीरा रोड येथील २८0 आणि ठाणे येथील काही घरांचाही समावेश असणार आहे. एकत्रित लॉटरी झाल्यास एकाच वेळी दोन्हीसाठी अर्ज करता येणार असल्याने अर्जदारांचीही सोय होणार आहे.
घरांच्या किमतींना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली नसल्याने ही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचारही कोकण मंडळातील अधिकारी करीत आहेत. या लॉटरीमध्ये विरार बोळींज, मीरा रोड आणि ठाणे येथील सुमारे ४ हजार घरांचा समावेश आहे.