मुंबईत सोने, चांदी व हिऱ्यांच्या ५० बॅग हस्तगत !
By Admin | Published: August 18, 2016 06:52 AM2016-08-18T06:52:56+5:302016-08-18T06:52:56+5:30
जकात चुकवून चोरट्या मार्गाने मुंबई सेंट्रलवर उतरवण्यात आलेल्या सोने, चांदी व हिरे असलेल्या तब्बल ५० बॅगा मुंबई महापालिकेच्या जकात विभागाने बुधवारी हस्तगत केल्या.
मुंबई : जकात चुकवून चोरट्या मार्गाने मुंबई सेंट्रलवर उतरवण्यात आलेल्या सोने, चांदी व हिरे असलेल्या तब्बल ५० बॅगा मुंबई महापालिकेच्या जकात विभागाने बुधवारी हस्तगत केल्या. यातील ऐवजाची एकूण किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. तथापि, तो कोट्यवधी रुपयांचा असल्याचा अंदाज जकात विभागाने व्यक्त केला आहे.
सोने, चांदी व हिऱ्यांच्या किमतीच्या तुलनेत त्यावर आकारण्यात येणारी जकात फारच कमी आहे़ परंतु केवळ काही लाख रुपये वाचविण्यासाठी व्यापारी चोरट्या मार्गाने सोने, चांदी आयात करतात़ याची खबर मिळताच पालिकेच्या जकात विभागामार्फत छापा टाकून माल जप्त करण्याची कारवाई केली जाते. बुधवारी आलेल्या मालाची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी दिली होती. त्याच्या आधारे हिरे, चांदी, सोन्याच्या तब्बल ५० बॅगा ताब्यात घेण्यात आल्या. या बॅगा जकात चुकवून मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आल्या होत्या, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)