महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:42 AM2022-03-19T11:42:39+5:302022-03-19T11:43:53+5:30

कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे.

50 BJP MLAs in touch with mahavikas Aghadi, Shivsena Sanjay Raut Claim on Raosaheb Danve Statement | महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

Next

मुंबई – महाराष्ट्रात होळीनंतर राजकीय धुळवडीला सुरूवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकतेच भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात सत्तेच्या घडामोडी घडतायेत का? अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं राज्यात खळबळ उडाली. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असं मला माहित आहे किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल. संपर्कात असतील तर घ्या ना, थांबला कशाला होळी संपली आहे. कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही. आम्ही असं बोललो तर भाजपाचे(BJP) ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

राज्यातील मतदारांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरुण घेतलं आहे. त्यामुळे आता ते हिरव्याचं समर्थन करतात. भगव्याचं समर्थन करत नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले २५ आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. निवडणुका जवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येते. नाव सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल असंही रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) म्हणाले.

MIM सोबत युती न करण्याची शिवसेनेची भूमिका

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे, बंगालमध्ये पाहिले आहे. त्यामुळे आधीच भारतीय जनता पक्ष सोबत ते काम करत आहे. त्यांच्या बरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध होऊ शकत नाही ते बी टीमच आहेत. आमचे स्पष्ट मत आहे. औरंगजेबाच्या कबरी पुढे नतमस्तक होणारे, कोणीही असतील, ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे, आदर्श होऊ शकत नाही, ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे की त्यांना लखलाभ ठरो असं सांगत शिवसेना नेते संजय राऊतांनी(Shivsena Sanjay Raut) MIM शी युती करणार नाही असं स्पष्ट केले आहे.

Read in English

Web Title: 50 BJP MLAs in touch with mahavikas Aghadi, Shivsena Sanjay Raut Claim on Raosaheb Danve Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.