मानवत येथे ५० मुलांना अन्नातून विषबाधा

By admin | Published: April 24, 2017 03:18 AM2017-04-24T03:18:09+5:302017-04-24T03:18:09+5:30

मानवत तालुक्यातील राजूरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी खाल्लेल्या पोह्यातून ५० मुलांना विषबाधा झाली.

50 children have died from poisoning in Manavat | मानवत येथे ५० मुलांना अन्नातून विषबाधा

मानवत येथे ५० मुलांना अन्नातून विषबाधा

Next

मानवत (जि. परभणी) : मानवत तालुक्यातील राजूरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी खाल्लेल्या पोह्यातून ५० मुलांना विषबाधा झाली. उपचारानंतर बाधितांपैकी २९ जणांना घरी सोडण्यात आले. यात बहुतांश मुलांचा समावेश आहे.
राजूरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी नाश्त्यासाठी पोहे करण्यात आले होते.
दुपारी ४च्या सुमारास मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे काहींना कोथाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. सायंकाळी ७.३० पर्यंत जवळपास ५० जणांना विषबाधा झाल्याने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर या सर्वांना रविवारी सुटी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 50 children have died from poisoning in Manavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.