उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:11 PM2023-07-26T19:11:46+5:302023-07-26T19:12:39+5:30

राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले.

50 crore for Uppalwadi MIDC, Nitin Raut's demand in the Assembly | उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

googlenewsNext

नागपूर : विदर्भातील महत्वाचे व नागपूर येथील उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलद गतीने घडवून आणण्यासाठी व येथे पायाभूत सुविधांचे सक्षम जाळे उभे करण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी माजी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केली. राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले.

२२.०९ एकर परिसरात पसरलेल्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरात १०० युनिट कार्यरत असून, त्यात सुमारे ५ ते ६ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक कंपन्यांनी विस्तारही केला. येथील उद्योजकांमार्फत सांडपाणी, पाणी, मालमत्ता, आग, लाईट आदींसाठी नियमितपणे कर आणि शुल्क भरण्यात येतो. सर्व कर भरूनही प्रशासनाकडून येथील उद्योजकांना कोणतीही सुविधा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. स्वच्छता, रस्त्यांची देखभाल या मूलभूत सुविधाही दिल्या जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पथ दिवे नसल्याने अंधार
- या परिसरातील रोडवर पथदिव्याची सुविधाही नाही. रात्री कामाकरिता येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अंधारात यावे लागते. पावसामुळे पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेक अपघातही झाले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय व्हावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Web Title: 50 crore for Uppalwadi MIDC, Nitin Raut's demand in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.