मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

By admin | Published: October 10, 2016 05:58 AM2016-10-10T05:58:26+5:302016-10-10T05:58:26+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले

50 crores loss of freighters | मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

Next

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहतुकीबरोबरच एसटीच्या सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला. आंदोलनामुळे मालवाहतुकीचे तब्बल ५0 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली. या घटनेत एसटी बसगाड्यांचीही जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने महामंडळाला ३ कोटींपेक्षा जास्त फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नाशिक आणि परिसरात आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करतानाच जाळपोळही केली. यात मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. महामार्गाजवळच असणाऱ्या गोंदेगाव, वडवली गाव आणि आणखी एका ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. एक सुमो गाडी तर एक दुचाकी वाहन आंदोलनकर्त्यांकडून जाळून रास्ता रोको करण्यात आला. दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्पच होती. मुंबईहून कसारामार्गे नाशिकला जाणारी वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की,मुंबईच्या विविध भागांतून सुमारे ४५ हजारांहून अधिक माल वाहतुक गाड्या या मार्गाने उत्तर आणि पूर्व भारतात जातात. मुंबई-आग्रा द्रूतगती मार्गावरील घोटीनजीक झालेल्या रास्ता रोकोचा सर्वाधिक फटका बसला. बऱ्याच वाहनांच्या काचा फोडून टायर फाडण्यात आले आहेत. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रारही वाहन मालकांनी केली असल्याचे सांगितले. तीव्र आंदोलनामुळे माल वाहतुकीचे एका दिवसात सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. शिवाय आणखी १२ ते २४ तास आंदोलनाचा फटका बसल्यास नुकसानाची आकडेवारी वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाड्यांचे नुकसान मिळून वाहतुकदारांना ५० कोटींहून अधिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे ते म्हणाले.
दरम्यान या आंदोलनात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी सात एसटी बस जाळल्या तर नऊ बसची तोडफोड केली. यामुळे महामंडळाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. या मार्गावरुन एसटीच्या ५00 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यावर परिणाम झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जर परिस्थीती अशीच राहिल्यास सोमवारीही मालवाहतुक आणि एसटी सेवांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 50 crores loss of freighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.