धनादेश न वटल्याप्रकरणी एकास ५० लाख दंड व ६ महिने शिक्षा
By Admin | Published: June 23, 2016 10:10 PM2016-06-23T22:10:37+5:302016-06-23T22:10:37+5:30
माळशिरस येथे आईस्क्रीमच्या व्यवसायासाठी २५ लाख रूपाये उसने घेऊन त्या बदल्याद तारण म्हणुन दिलेला धनादेश वटला नाही त्याप्रकरणी अकलुज येथील प्रसिध्द आईस्क्रीम
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २३ - माळशिरस येथे आईस्क्रीमच्या व्यवसायासाठी २५ लाख रूपाये उसने घेऊन त्या बदल्याद तारण म्हणुन दिलेला धनादेश वटला नाही त्याप्रकरणी अकलुज येथील प्रसिध्द आईस्क्रीम व्यवसाईक अहमद महिबुब बागवान यांना ५० लाख रुपये दंड व सहा महिने शिक्षा न्यायाधीश एन. जी. व्यास यांनी ठोठावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने शिक्षेचा आदेशही त्यांनी सुनावला.
या खटल्याची माहिती अशी की, अकलुज प्रसिध्द असलेले नौशाद कोल्ड्रिंक्सचे मालक अहमद महिबुब बागवान (वय ३६ रा.अकलुज) यांनी त्यांच्याा व्यवसायासाठी त्यांचे मित्र नामदेव रघुनाथ वाघमारे (रा.बागेवाडी) यांच्या कडूना उसने २५ लाख रूपये घेतले होते. ते पैसे सहा महिन्याच्या आत परत करण्याबाबत शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहूनही दिले होते. मात्र सहा महिण्यानंतर वाघमारे यांना पैशाची मांगणी केल्यावर बागवान यांनी २७ फेबु्रवारीला वाघमारे यांना आयडीबीआय बॅकेचा धनादेश दिला. परंतु संबंधित अकाउंटवर तितके पैसे नसल्याने चेक बाउन्स झाला. त्यामुळे वाघमारे यांनी बागवान आपल्या वकिाला मार्फत रितसर पैसे दयावे यासाठी नोटिस पाठविली. परंतु त्यांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले होते. अखेर वाघमारे यांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजुचे म्हणने ऐकून घेतल्यावर चलन दस्तांतरण कायदया अंतर्गत १३८ प्रमाणे न्यायालयाने बागवान यांना आरापीस ५० लाख रूपये दंड सहा महिने शिक्षा तर दंड न भरल्यास आणखीन सहा महिने दंडाची शिक्षा ठोठावली.या खटल्यामध्ये फिर्यादी तर्फे अॅड.ए.डी.भगत यांनी तर आरोपी तर्फे के.व्ही.फरकंडे यांनी काम पाहिले.