गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

By admin | Published: December 1, 2015 02:14 AM2015-12-01T02:14:32+5:302015-12-01T02:14:32+5:30

यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास

50 percent loss of wheat crop! | गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

गहू पिकाचे ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान!

Next

अकोला : यावर्षी सरासरी पाऊस कमी झाला आणि पेरणीनंतर प्रदीर्घ खंडही पडला. हवामानाच्या बदलत्या चक्रात कीड, तसेच विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने विदर्भात गहू पिकाचे जवळपास ३५ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. मूग, उडीद हातचे गेले, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता कापसाचे उत्पादनही कमी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे अल्प संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती; परंतु जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत परतीचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय संरक्षित ओलितासाठीचे पाणी संपत आल्याने ४६ टक्के शेतकऱ्यांचे जवळपास ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाले. यावर्षी परिस्थिती जास्तच भीषण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अत्यंत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.
दरम्यान, विदर्भात सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सरासरी १२ ते १५ क्विंटल आहे. यावर्षी हे उत्पादन हेक्टरी दीड ते २ क्ंिवटलपर्यंत मिळाले आहे.
राज्यात सोयाबीनखालील क्षेत्र जवळपास ३८ लाख हेक्टर आहे. यातील विदर्भात हे क्षेत्र १९ ते २० लाख हेक्टरपर्यंत आहे. मागील वर्षी विदर्भात १९ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादन जवळपास ७५ लाख क्ंिवटलपर्यंत पोहोेचले होते. यावर्षी प्रतिकूल हवामान व वातावरण असल्याने विदर्भात १६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु वातावरणाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा हेक्टरी दीड ते २ क्ंिवटल आला आहे. हजारो शेतकऱ्यांना तर एकरी २० ते ५० किलोचा उतारा आला आहे. त्यामुळे यावर्षीचे उत्पादन ३० ते ४० लाख क्ंिवटलच्या आतच असून, बहुसंख्य शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा झाला आहे.

जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान पावसाच्या अनियमिततेचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, ४६ टक्के शेतकऱ्यांचे ३५ ते ५० टक्के गव्हाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने परिस्थिती प्रतिकूल आहे.
- डॉ. एन.एम. काळे, विस्तार शिक्षण,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: 50 percent loss of wheat crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.