५० टक्के पेट्रोलियम कर्मचारी करतात १०० टक्के काम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:05 AM2020-04-08T06:05:56+5:302020-04-08T06:06:49+5:30
काम करताना मास्क, पर्सनल प्रोटेक्शन किट देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ५० टक्के कर्मचारी कपात करण्यास सांगितले होते. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांमध्येही ५० टक्केच कर्मचारी काम करत असून बीपीसीएल कंपनीत केवळ इतकेच कर्मचारी १०० टक्के काम करत आहेत.
भारत पेट्रोलियम प्रोसेस टेक्निशियन अँड लॅब अनलिस्ट युनियनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारच कामावर आहेत. लिपिक व इतर विभागांना रजा देण्यात आली आहे. प्रॉडक्शन विभाग, सफाई विभाग, कँटीन कर्मचारी कामावर येत आहेत. प्रॉडक्शन विभागात ५० टक्के कामगार येत आहेत. पण ते १२ तास काम करत आहेत. त्यामुळे उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.
तसेच काम करताना मास्क, पर्सनल प्रोटेक्शन किट देण्यात येत आहे. कच्च्या तेलापासून पेट्रोल,डिझेल, केरोसीन, गॅस आदी उत्पादने घेतली जात आहेत. रेल्वे बंद असल्याने टँकरने विविध भागात या उत्पादनांचा पुरवठा केला जात आहे असे त्या पदाधिकाºयाने सांगितले.
कर्मचाऱ्यांना हवी कौतुकाची थाप
पेट्रोलियम कंपनी ही एक अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. आता १०० टक्के काम सुरू आहे. कर्मचारी १२ तास काम करत आहेत. पोलीस ,डॉक्टर यांच्या त्यागाचे कौतुक केले जाते. ते करायलाच हवे. परंतु पेट्रोलियम कर्मचाºयांना देखील कौतुकाची थाप मिळायला हवी, असे मत पदाधिकाºयाने व्यक्त केले