जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांमध्ये पदमान्यतेत ५0 टक्के कपात
By admin | Published: November 25, 2015 02:00 AM2015-11-25T02:00:02+5:302015-11-25T02:00:02+5:30
नवनिर्मित प्रयोगशाळेतील कर्मचा-यांना सहन करावा लागतो अतिरिक्त भार.
वाशिम - राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांमध्ये प्रत्येकी १0 पदे मंजूर आहेत; मात्र नवीन जिल्ह्यांमध्ये आरोग्य प्रयोगशाळा मंजूर करताना कर्मचार्यांमध्ये ५0 टक्के कपात केली जात आहे. आरोग्य प्रयोगशाळेकडे कामे सारखीच असून, पदांमध्ये मात्र कपात केल्याने नवनिर्मित प्रयोगशाळेतील कर्मचार्यांना अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणांवर आहे. हा पाणीपुरवठा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे, जलस्त्रोत शुद्ध आहेत की दूषित, आदींची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य प्रयोगशाळेची स्थापना केली जाते. येथे पाणी व मिठातील रासायनिक व अन्य घटकांची तपासणी करून अहवाल दिला जातो. जिल्हाभरा तून आलेल्या पाण्याचे नमुने तपासणे आणि तातडीने अहवाल देण्याचे काम सुकर व्हावे म्हणून प्रत्येक जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत १0 पदांना मंजुरात आहे. यामध्ये वर्ग दोनचे एक पद, वर्ग तीनची तीन पदे, लिपिक, चतु र्थ श्रेणी कर्मचारी व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी प्रत्येकी दोन अशा १0 पदांचा समावेश आहे; मात्र गत वर्षभरा पासून नवीन आरोग्य प्रयोगशाळा देताना मंजूर पदांमध्ये ५0 टक्के कपात केली जात असल्याने कर्मचार्यांवर कामाचा बोजा पडत आहे. वाशिम, हिंगोली, गोंदीया व नंदूरबार या चार जिल्ह्यात आरोग्य प्रयोगशाळेच्या पद मान्यतेत ५0 टक्के कपात केल्याने पाच कर्मचार्यांवरच कामकाजाचा गाडा हाकला जात आहे. त्यातही दोन कर्मचार्यांना अन्य जिल्ह्यातील रिक्त पदांचा अतिरिक्त प्रभार दिला जात असल्याने, तीन कर्मचार्यांनाच आरोग्य प्रयोगशाळा सांभाळावी लागत आहे. वाशिम व हिंगोली येथील प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून एकाच अधिकार्याला सेवा द्यावी लागत आहे. वाशिम व यवतमाळ येथेही कर्मचार्यांची प्र ितनियुक्ती दिल्याने मंजूर पदांपेक्षांही कमी कर्मचार्यांवर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा गाडा सुरू आहे. नवनिर्मित प्रयोगशाळेत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ रासायनिक सहायक, अणूजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कनिष्ठ लिपिक प्रत्येकी एक अशी एकूण पाच पदे मंजूर आहेत. रासायनिक सहायक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अणूजीव सहायक, प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा स्वच्छक अशी प्रत्येकी एक अशा एकूण पाच पदांची कपात नवनिर्मित आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. याचा फटका नवनिर्मित प्रयोगशाळेतील कामकाजावर होत असून, कामाची गति मंदावत असल्याचे दिसून येते.