राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:19 AM2018-07-29T01:19:04+5:302018-07-29T01:19:23+5:30

राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

50 percent water stock in the dams of the state, Mumbai's water tension will be eradicated | राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

googlenewsNext

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यातील पाणीसाठा हा ४७.७० टक्के होता. यंदा तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४१ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१६-१७ मध्ये सिंचनाखालील शेतजमिनीचे क्षेत्र ४० लाख हेक्टर इतके होते.
मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार करता, आतापर्यंत सर्वाधिक धरणे ही कोकण विभागात (८६.५६ टक्के) तर सर्वात कमी धरणे ही नागपूर विभागात (१७.४४ टक्के) आणि अमरावती विभागात २०.६८ टक्के तर मराठवाड्यात २६.७७ टक्के इतकी भरली आहेत. नाशिक विभागातील मोठी धरणे ६३.४६ टक्के भरली आहेत.
मध्यम प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती विभाग २७.५६, नागपूर २२.६०, कोकण ८६.८८, नाशिक ३२.०७, पुणे ५५.०७, मराठवाडा १७.९०.
लघु प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती १८.१९, नागपूर २६.०८, कोकण ७७.५२, नाशिक ३२.३८, पुणे १७.५८ आणि मराठवाडा १२.९८. राज्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांत ३८.३६ तर लघु प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा
राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ आणि मराठवाड्यात झाली असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार
पावसाने गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र तलाव क्षेत्रांत अधूनमधून वरुण राजाची हजेरी असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभराचा जलसाठा जमा होण्यासाठी केवळ अडीच हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.
या वर्षी पावसाने जुलै महिना गाजवला. जोरदार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली, मात्र तलावांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावामध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे.
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा दरवर्षी असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये ८३ टक्के म्हणजे १२ लाख ३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५७
विहार ८०.१२ ७३.९२ ८०.१६
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१६
अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.२९
भातसा १४२.०७ १०४.९० १३५.८५
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.४२

Web Title: 50 percent water stock in the dams of the state, Mumbai's water tension will be eradicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.