यवतमाळमधील मारेगावात ५० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: January 12, 2017 04:29 PM2017-01-12T16:29:05+5:302017-01-12T16:40:48+5:30
मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वणी, दि. 12 - मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली, अजूनही २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी पाचवी ते दहाव्या वर्गात शिकणारे आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता जेवण केल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात बसले. मात्र या विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यामुळे आश्रमशाळा प्रशासन हादरून गेले. लगेच या विद्यार्थ्यांना मारेगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकी विषबाधा कशाने झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान आश्रमशाळेतील अन्न व पाण्याचे नमूने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी रूग्णालयात जावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.