५०० ते १५०० रुपयांनी टीव्ही, फ्रीजच्या किमती वाढणार !

By admin | Published: May 21, 2017 02:41 AM2017-05-21T02:41:24+5:302017-05-21T02:41:24+5:30

जीएसटी या नवीन करप्रणालीत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. परिणामी, जीएसटी लागू झाल्यानंतर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन,

500 to 1500 TV, freeze prices will increase! | ५०० ते १५०० रुपयांनी टीव्ही, फ्रीजच्या किमती वाढणार !

५०० ते १५०० रुपयांनी टीव्ही, फ्रीजच्या किमती वाढणार !

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद :जीएसटी या नवीन करप्रणालीत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. परिणामी, जीएसटी लागू झाल्यानंतर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हनच्या किमती सुमारे ५०० ते १५०० रुपयांनी वाढतील.
यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे डीलर्स पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावर सध्या व्हॅट व उत्पादन शुल्क मिळून २५ टक्के कर आकारण्यात येत आहे. जीएसटीमध्ये २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. ३ टक्क्यांनी करवाढ झाल्याने त्याचा निश्चित परिणाम या उपकरणांच्या किमतीवर होणार आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार उदाहरणार्थ २० ते २५ हजार रुपयांदरम्यानच्या एलईडी टीव्ही ७५० रुपयांनी तर ४० ते ५० हजार रुपयांचा एलईडी टीव्ही १५०० रुपयांनी महाग होईल. १५ ते २० हजार रुपयांदरम्यानचा सिंगल डोअर फ्रीज ५०० ते ८०० रुपये, तर २५ ते ४० हजार रुपयांदरम्यानचा डबलडोअर फ्रीज १२०० ते १५०० रुपयांनी वाढेल. १५ ते २५ हजार रुपयांचा वॉशिंग मशीन ८०० ते १ हजार रुपयांदरम्यान तर मायक्रोओव्हन ६०० ते ८०० रुपयांदरम्यान भाव वाढतील. २५ ते ४० हजार रुपयांदरम्यानच्या एसीमध्ये १२०० ते १५०० रुपयांनी भाववाढ होईल.
येत्या काळात किमती समान ठेवण्यासाठी काय निर्णय घेतात, यावर सर्व अवलंबून आहे. देशपातळीवर सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या एकसमान किमती असतील.

Web Title: 500 to 1500 TV, freeze prices will increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.