500 आणि 1000 च्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 02:07 AM2016-11-13T02:07:01+5:302016-11-13T02:07:01+5:30
रेल्वे स्टेशन चौकातील पोलीस चौकी येथून एका ऑटोची तपासणी करून त्यामधील 9 लाख रुपयांची रोकड शनिवारी मध्यरात्री जप्त करण्यात आली
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 13 - रेल्वे स्टेशन चौकातील पोलीस चौकी येथून एका ऑटोची तपासणी करून त्यामधील 9 लाख रुपयांची रोकड शनिवारी मध्यरात्री जप्त करण्यात आली, यामध्ये चलनातून बॅड झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ऑटो चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.
खैर मोहमद प्लॉट येथील रहिवासी अब्दुल वाशिक अब्दुल हदीक 40 हा MH 30, AA 7157 क्रमांकाच्या ऑटोने चलनातून रद्द झालेल्या 500 रुपयांच्या नोटांचे 7 लाख रुपये आणि 1 हजार रूपयांचे नोटांचे 2 लाख रुपये असे 9 लाख रुपये घेऊन जात असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली, यावरून पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्येक ऑटोची तपासणी सुरु केली असता अब्दुल वासीक याच्या ऑटोत असलेल्या बॅग मधून 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांची 9 लाख रुपयांची रोकड मिळून आली, रामदास पेठ पोलिसनि हि रक्कम जप्त केली असून ती कोणाची आहे याची चौकशी सुरु केली आहे, ऑटो चालकाने रक्कम कुनाच्या मालकीची आहे या संदतभात उलगडा केला नाही, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसुन चौकशी सुरु केली, ही कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेटशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांच्या मार्गदर्शनात अंबादास खंडवाय, संजय अकोटकर, प्रशांत इंगळे आणि श्रीकांत यांनी केली.