500 आणि 1000च्या नोटांची सोशल मीडियावरून खिल्ली !

By Admin | Published: November 9, 2016 12:11 AM2016-11-09T00:11:46+5:302016-11-09T00:34:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

500 and 1000 notes on social media! | 500 आणि 1000च्या नोटांची सोशल मीडियावरून खिल्ली !

500 आणि 1000च्या नोटांची सोशल मीडियावरून खिल्ली !

googlenewsNext

वैभव देसाई/ ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांच्या एटीएमवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काहींनी या निर्णयाची सोशल मीडियावरून खिल्ली उडवली आहे. 500 आणि 1000च्या नोटांचे विडंबनात्मक फोटो फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अपवर वा-यासारखे पसरले आहेत. एकीकडे नोटांना हार-तु-यांनी सजवण्यात आलं आहे. दुसरीकडे नोटांचा चकण्यासाठी वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत सोशल मीडियावरून 500 ते 1000च्या नोटांवरून टर उडवली जात आहे. अनेक पद्धतीचे मेसेजची सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही व्हायरल झालेले फोटो आणि मेसेज

-पुणेरी पाटी 
येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल.... 
 
- Americans Counting Votes,
Indians Counting Notes
 
- देशात अचानक ब्लड प्रेशरच्या पेशंटच प्रमाण वाढणार आहे आता.. 
अण्णा हजारे यांनी पंधरा वर्षापूर्वी पाचशेच्या नोटेला भ्रष्टाचाराचे साधन म्हणून विरोध केला पण त्यावेळी हजाराची नोट काढली. आज मध्यरात्रीपासून 500 ₹. आणि 1000₹. नोटा बंद हा मोदींचा निर्णय नसून अण्णा हजारे यांची मागणी पूर्ण झाली आहे.

- बायकांनो ..............
साड्यांच्या घडी मध्ये लपवलेल्या नोटा मुकाट्याने नवऱ्याला द्या 

- म्हणून मी आधीच पळून गेलो...- विजय तात्या माल्या
 
- मेरे पास गाडी है , बंगला है ,बैंक बैलेंस है , तेरे पास क्या है ? 
भाई मेरे पास 100 100 के नोट है
 
- अजित पवार- काका आता काय करू.
  शरद पवार- आता मूत त्या नोटांवर
 
- पाचशे- हजारवाले आज 'व्हेंटिलेटरवर', १०० वाले आज 'वजनदार' ;)
 
- मोठी भरती
  शरद पवार यांचे 500-1000 रुपयांच्या नोटा मोजायला मुलं-मुली पाहिजेत

- या वर्षी कोणी लग्न करू नका
पाकिटात 101 च मिळतील
 
- नाही नाही एप्रिल फुल असेल...- राहुल गांधी
 
- Sab se jyada problem to Big Boss k contestants ko hone wali h
Un becharo ko to pata bhi nhi bahar kya chal raha h
Jab tak bahar aayenge, tab tak sab khatam
 
- कृपया जोक्स बनवू नयेत....पैसे आधीच डॉलर मध्ये कन्व्हर्ट केले आहेत...-शरद पवार
 
- आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही-  काँग्रेस
 
- राज्यात झेडपी, पालिका निवडणुका आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूक पूर्वीच मोदींचं ब्लॅक मनी सर्जिकल स्ट्राईक... 
  काळा पैसा दबल्यानं प्रस्थापित बाहुबलींना फटका बसण्याची शक्यता... 
  मिनी विधानसभा समजल्या झेडपीत ग्रामीण भागात रुळलेल्या राजकीय पक्षांना धक्का...
 

Web Title: 500 and 1000 notes on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.