‘मलिष्का’वर ५00 कोटींचा दावा ठोकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:40 AM2017-07-19T00:40:26+5:302017-07-19T02:11:30+5:30

पावसाळ्यात मुंबईच्या उडणाऱ्या दैनावर प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्का हिचे गीत सत्ताधारी शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे

500 crore claim on 'Mallika' | ‘मलिष्का’वर ५00 कोटींचा दावा ठोकावा

‘मलिष्का’वर ५00 कोटींचा दावा ठोकावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात मुंबईच्या उडणाऱ्या दैनावर प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्का हिचे गीत सत्ताधारी शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे. त्यामुळे मलिष्कावर कायदेशीर कारवाई करीत तिच्या विरोधात ५00 कोटी रुपयांचा दावा महानगरपालिकेने दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे आज केली. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत विधि खात्याचे मत मागविल्याचे सूत्रांकडून समजते. 
‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ हे गीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात रेडिओ जॉकी मलिष्का ‘मुंबईत पाणी तुंबतं, रेल्वे सेवा लेट होते’, ‘मुंबईत खड्डे पडतात आणि पावसात पालिकेची पोलखोल होते’ असे गीताद्वारे सांगते आहे. पहारेकरी आधीच दबा धरून बसले असताना हे गाणे म्हणजे भाजपाच्या हाती आयते कोलीत आल्यासारखे आहे. त्यामुळे मलिष्कावर कारवाईची मागणी करीत प्रतिस्पर्ध्यांचे तोंड बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. 
त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांनी आयुक्तांची आज त्यांच्या दालनात भेट घेतली. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. मुंबईविषयी चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले, याची दखल घेऊन आयुक्तांनी विधि खात्याकडे याविषयी मत मागितले आहे.

Web Title: 500 crore claim on 'Mallika'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.