BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात
By संजय पाठक | Published: June 1, 2023 02:55 PM2023-06-01T14:55:17+5:302023-06-01T14:56:08+5:30
चौकशीचे काम सुरू असून आता महापालिकेच्या डझनभर इंजिनिअर्सला नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.
नाशिक- आर्थिक घेाटाळ्यांचे आरेाप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याची तयारी केली आहे. रविंद्र वायकर यांचे मुंबईत पाचशे कोटींचे हॉटेल मुंबई महापालिकेच्या आरक्षित जागेवर बांधत आहेत. त्यात महापालिकेने मंजुरी दिलीच कशी असा प्रश्न करताना सोमया यांनी रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर असल्यानेच त्यांना सर्व प्रकारच्या मंजुरी देण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे.
सोमय्या हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी बोलताना अब की बारी, रविंद्र वायकर असल्याचे सांगितले. वायकर हे ठाकरे यांचे बंगले प्रकरणात पार्टनर आहेत. मुंबई महापालिकेचा ओपन आणि प्ले ग्राऊंडचा प्लॉट आरक्षित असताना त्यावर परवानगी देण्यात आली. यासंदर्भात मार्च २०२३ मध्ये मी पोलीसांत तक्रार केली हेाती. त्यानुसार चौकशीचे काम सुरू असून आता महापालिकेच्या डझनभर इंजिनिअर्सला नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका अठरा वर्षाच्या मुलीला विवाहीत इसमाने फसवून पळवून नेले. नाशिक पेालीसांनी यामुलीला शोधून आणले असून २४ तासांपूर्वी या मागासवर्गीय मुलीला पालकांच्या ताब्यात दिले आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असून संबंधितावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पीडीत कुटूंबियांसह आपण पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्याचे सोमया यांनी सांगितले