पदव्युत्तर वैद्यकीयच्या ५०० जागा
By admin | Published: May 13, 2017 02:20 AM2017-05-13T02:20:12+5:302017-05-13T02:20:12+5:30
पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ५०० जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राज्य शासनाने खासगी आणि अभिमत संस्थांमध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ६७.५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात काही पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती.
त्यामुळे न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही, असे नमूद केले होते. त्यामुळे राज्य शासनाची अडचण झाली होती, असे त्यांनी सांगितले.