नागपुरात 5 हजार बालके कुपोषित
By admin | Published: August 10, 2014 02:15 AM2014-08-10T02:15:47+5:302014-08-10T02:15:47+5:30
उपराजधानीतील अंगणवाडय़ांमध्ये करण्यात आलेल्या सव्रेक्षणातून कुपोषण संदर्भातील धक्कादायक बाब समोर आली आहे.
Next
>नागपूर : उपराजधानीतील अंगणवाडय़ांमध्ये करण्यात आलेल्या सव्रेक्षणातून कुपोषण संदर्भातील धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेने केलेल्या सव्रेक्षणामध्ये उपराजधानीत 5 हजार बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. जर नागपूरसारख्या शहरात ही स्थिती असेल तर राज्यात किती बालके कुपोषणग्रस्त असतील, असा प्रश्न संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या फारच कमी असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात आला होता. पाहणी केली असता अंगणवाडय़ांमधील वजनयंत्रच बिघडली असल्याचे डॉ. गोगुलवार यांच्या लक्षात आले. त्यानंतर ‘डिजिटल’ वजनयंत्रच्या साहाय्याने त्यांनी नागपुरात एक विशेष मोहीम राबविली.