वर्षभरात रुग्णवाहिकेत साडेपाच हजार बाळांचा जन्म

By admin | Published: December 29, 2015 02:00 AM2015-12-29T02:00:24+5:302015-12-29T02:00:24+5:30

‘डायल १0८’ सेवा ; महिलांची प्रसुती झाली सुलभ.

50000 babies born in the ambulance throughout the year | वर्षभरात रुग्णवाहिकेत साडेपाच हजार बाळांचा जन्म

वर्षभरात रुग्णवाहिकेत साडेपाच हजार बाळांचा जन्म

Next

नीलेश शहाकार/ बुलडाणा : ह्यडायल १0८ह्ण या सरकारी सेवेमुळे वर्षभरात तब्बल ५ हजार ८५१ बालकांचा रुग्णवाहिकेत जन्म झाला. विशेष म्हणजे सरकारी आरोग्य सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागात महिलांची प्रसुती सुलभ झाली.
आरोग्य विभागाने डिसेंबरमध्ये तयार केलेल्या अहवालात जानेवारीपासून २८ नोव्हेंबरपर्यंंतची आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. वेळेवर उपचार मिळू न शकल्याने माता व नवजात अर्भकाचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी २६ जानेवारी २0१४ पासून राज्य शासनाकडून महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस अंतर्गत ह्यडायल १0८ह्ण रुग्णवाहिका सेवा सुरू झाली.
१0८ क्रमांक डायल केल्यानंतर सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह उपरोक्त ठिकाणी येते. गर्भवती महिलेवर तत्काळ उपचार करून वेळप्रसंगी रुग्णवाहिकेत प्रसुतीही केली जाते. राज्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात २३३ ह्यअँडव्हान्स लाईफ सपोर्टह्ण आणि ७0४ ह्यबेसिक लाईफ सपोर्टह्ण रुग्णवाहिका आहेत. गर्भवती महिलासांठी या रुग्णवाहिका वरदानच ठरल्या आहेत.

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये एक हजार १३0 तर अहमदनगर २६२, औरंगाबाद ३२0, बीड ३३२, धुळे ११२, हिंगोली १४३, जळगांव १३५, जालना १४२, कोल्हापूर १६६, लातूर २३३, मुंबई ६0, नांदेड २0५, नंदूरबार १४0, नाशिक ३३७, उस्मानाबाद १७५, परभणी १३७, पुणे ३८५, रायगड ५८, रत्नागिरी ४८, सांगली १३९, सातारा २६४, सिंधुदुर्ग १९, सोलापूर ३६७, ठाणे १७५ तर पालघर जिल्ह्यात १६६ बाळांचा रुग्णवाहिकांत जन्म झाला.

Web Title: 50000 babies born in the ambulance throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.